आम आदमी पक्षाचं आक्रोश प्रदर्शन, चीन ने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत शहिदांना वाहिली श्रद्धांजली

0
186
Advertisements

चंद्रपुर – चीन कडून भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीन निर्मित कोरोनाच्या संकटाचा भारतासह जगातील जवळपास सर्वच देश कसोशीने सामना करत आहे. अशावेळी कुठलीही मानवता न बाळगता चीन भारतीय सीमारेषेवर तणाव निर्माण करू पाहत आहे, याचा आम आदमी पक्ष तीव्र निषेध करीत आहे. या संकट समयी संपूर्ण देशाच्या सदभावना आपल्या वीर जवानांच्या पाठीशी आहेत याप्रसंगी आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याकडून गाव, तालुका, जिल्हा व शहर पातळीवर राज्यभर “आक्रोश प्रदर्शन” करण्यात आले या ठिकाणी आपल्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली तसेच चीन विरोधात निषेध म्हणून आक्रोश व्यक्त करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत शारिरीक अंतर ठेवून मास्क लाऊन प्रशासनाला कुठलीही तसदी न देता आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यानी राज्यव्यापी आक्रोश प्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, संतोष दोरखंडे, भिवराज सोनी,राजु कुडे, दिलीप तेलंग,मयूर राईकवार, सुनील भोयर, योगेश आपटे, प्रशान्त एरने, देवकी देशकर, राजेश चेड़गुलवार, शंकर धुमाळे, राजू कूड़े, विशाल भाले, रामदास पोटे, राशिद शेख, मुजफ़र खान, अमजद शेख, मीणा शेगोकर, सुभाष शेगोकर , अशोक आनंदे , अजय डुकरे तसेच ईतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here