जिल्ह्या बाहेरून येणारी सुगंधित तंबाखूची वाहतूक बंद, तंबाखू माफिया झाले “आत्मनिर्भर”, ईगलचा मजा आता “मेक इन चंद्रपूर”?

0
108
Advertisements

पोर्टल बंद करा म्हणणारे आता पोर्टलवर बहिष्कृत

चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात मात्र सर्वत्र धुमाकूळ गाजवीत आहे, दारू सारखं आता सुगंधित तंबाखूने बनविलेला खर्रा आता सहज कुठेही मिळत आहे, दाम दुप्पट भावाने खरर्याची विक्री सुरू आहे.

कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाउन असताना सुद्धा हा सुगंधित तंबाखू सहसा जिल्ह्यात दाखल होत आहे याचे कारण म्हणजे जिल्ह्यात सुगंधित तंबाखू माफिया वसीम व जैसुक यांची यामध्ये असलेली सक्रियता.

हे माफिया इतके हुशार झाले आहे की प्रशासनाच्या डोळ्यात ते सहसा धूळ सुद्धा फेकत आहे, काही दिवसांपूर्वी वसीम नामक तंबाखू माफियांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी धाड मारली असता त्या गोदामात सुगंधित तंबाकू आढळून आला नाही परंतु तंबाखूचे काही बॅग्स तिथे आढळले होते ते प्रतिबंधित नसल्याने कारवाई झाली नव्हती.

या महिन्यात बाहेर जिल्ह्यातून येणारी सुगंधित तंबाखूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे, आता सुगंधित तंबाखू ईगल व मजा आपल्या चंद्रपूर शहरात बनत आहे अशी खात्रीलायक माहिती news34 च्या हाती लागली आहे, म्हणजे आता जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू माफिया आत्मनिर्भर झाले.

कच्चा तंबाखु बाहेर जिल्ह्यातून चंद्रपुरात बोलवायचा व त्या कच्च्या मालाच्या आधारे सुगंधित तंबाखू निर्माण करायचा असा धंदा हे माफिया शहरात करायला लागले आहे.

वसीम व जैसुक सारखे तंबाखू माफिया जिल्ह्यातील युवा पिढीला कॅन्सरच्या विळख्यात टाकत आहे व प्रशासनाला याची तिळमात्र जाणीव नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here