राज्यात सत्ता असूनही कांग्रेसला कार्यकर्त्यांची कमतरता, तोच रुग्ण आणि तोच कार्यकर्ता, गडचांदूरातील अजब प्रकार

0
188
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
काॅग्रेसचे राष्ट्रीय नेते,खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात काँग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे.याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील गडचांदूर काँग्रेस पक्षाने स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता.मात्र या कार्यक्रमातील दोन फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे.यासंबंधी शहरात ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात हास्यास्पद चर्चांना उधाण आले असून या मागील कारण ही तसेच आहे.यामध्ये बेडवर बसलेल्या ज्या रुग्णाला फळवाटप करण्यात आले नंतर तोच रूग्ण अगदी ठणठणीत बाहेर कार्यक्रमाचे बॅनर धरून उभा दिसत आहे.असा कार्यक्रम आजपर्यंत कधीही पाहिला नसल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांसोबत सदर रुग्णाने बॅनर पकडून आपले फोटो काढून घेतले आणि तेच फोटो काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले.सध्या या फळ वाटप कार्यक्रमाची परिसरात खमंग चर्चा सुरू असून हे फोटो सध्या सोशल मिडीयावर नागरिकांसाठी विनोदाचा भाग बनला आहे.सदर रूग्ण हा गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी असल्याची माहिती असून एकच व्यक्ती दोन ठिकाणी हा प्रकार काॅग्रेस नेत्यांच्या लक्षात कसाकाय आला नाही याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.गडचांदूर रुग्णालयातील काॅग्रेसच्या या अजब गजब फळ वाटपाची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरू आहे.यावेळी गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थीपे, माजी सभापती नोगराज मंगरूळकर,हंसराज चौधरी,नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक विक्रम येरणे,सभापती सौ.जयश्री ताकसांडे,स्वीकृत सदस्य पापाय्या पोन्नमवार, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम,अर्चना वांढरे,शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे,कार्याध्यक्ष अहमद भाऊ,युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव शैलेश लोखंडे,सुरेश टेकाम,प्रीतम सातपुते,विठ्ठलराव कांबळे, रुपेश चुदरी,राहुल ताकसंडे, आदी कार्यकर्त्यांची उपस्थीतीत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here