वृंदावन, तुलसीनगर परिसरात रेती तस्करांचा गोरखधंदा, महिलेचा गेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – नितीन उदार

0
206
Advertisements

चंद्रपुर – शहरातील राष्ट्रवादीनगर येथे असणा-या नाल्याच्या बाजुला रेतीच्या अवैध उत्खननातुन निर्माण झालेल्या तलावसदृष्य मोठ्या गढढ्यात येथीलच लखमापुर परीसरातील एक मजुर महीला आज दिनांक 19 जुन रोजी सकाळी त्या गढ्ढयाची दरड कोसळुन दुदैवीपणे त्यात मरण पावली.
मागील काही महीन्या पासुन राष्ट्रवादी नगर मधील नाल्याजवळच्या रेतीचे उत्खनन करुन ती रेती तेथीलच राष्ट्वादी नगर, तुलसीनगर वृंदावन नगर परीसरात विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे.

त्याच परीसरात चंद्रपुर महाऔष्णीक विज निर्मीती केंद्र असुन त्याच्या संरक्षण भितींचे उंचीकरण आणी दुरुस्तीचे जे मोठे काम सुरु आहे त्यासाठी सुध्दा कंत्राटदाराकडुन याच चोरीच्या रेतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
सदर रेती अतीशय मातीमिश्रीत रेती असुन कंत्राटदार त्या कामाकरीता येथील चोरी सोबतच चंद्रपुर महाऔष्णीक विज निर्मीती केंद्राच्या कामाचा दर्जाही खराब करीत असल्याचेही सहजपणे लक्षात येत आहे.

Advertisements

सदर महीलेच्या मृत्युस कारण ठरलेल्या त्या रेतीचोरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवुन कारवाई करण्याची गरज आहे.

चंद्रपुर महाऔष्णीक विज निर्मीती केंद्राच्या सरंक्षण भिंतीच्या करोडोंच्या बांधकामाचे कंत्राट सुभाष कासनगोट्टुवार या कंत्राटदार एजन्सीचे आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here