अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना मारहाणीनंतर सुद्धा सुगंधित तंबाखूवर नियंत्रण ठेवण्यास विभाग सपेशल अपयशी

0
189
Advertisements

चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू तस्करी वर अजूनही आळा बसलेला नाही, राज्यात आज सुद्धा सुगंधित तंबाकू मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू आटोक्याबाहेर झाला आहे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर सुद्धा सुगंधित तंबाखूच्या तस्करीवर अजूनही नियंत्रण करण्यात आले नाही.

Advertisements

याच्या मागचं कारण काय? हा सध्यातरी न समजणारा प्रश्न आहे, लॉकडाउन मुळे अहमदाबाद, सुरत या राज्यात सुगंधित तंबाखू निर्मितीचे कारखाने बंद आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू येत तरी कसा आहे, याबद्दल प्रशासनाला कल्पनाच नाही.

वसीम व हरीश सारखे मोठे व्यापारी या अवैध तंबाखू व्यवसायाचे किंग झाले आहे, या लोकांवर नियंत्रन आले की आपोआप च ही तस्करी थांबेल, लॉकडाउन मध्ये सुद्धा सुगंधित तंबाकू जिल्ह्यात येत आहे, या व्यापाऱ्यांचे मोठे गोदाम शहरात आहे परंतु त्या गोदामात तोडक्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा हे ठेवत असतात आता संशय येऊ नये म्हणून गोदाम सुद्धा बदलल्या गेले आहे.

सुगंधित तंबाखु ज्यावेळेस जिल्ह्यात दाखल होतो त्यावेळी सर्वप्रथम हा माल मोठे व्यापारी नंतर लहान व्यापारी व नंतर पान टपरी अशी यांची चैन आहे ही चैन ज्यादिवशी मोडणार त्यादिवशी मात्र हा अवैध व्यापार निश्चितच थांबणार.

परंतु प्रशासन यावर गंभीर असायला हवं, जोपर्यंत प्रशासन या अवैध धंद्यांना पाठबळ देणार तोपर्यंत तरी वसीम सारखे व्यापारी आपले जाळे जिल्ह्यात पसरविणार.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यावर हे व्यापारी आता हात उचलायला लागले आहे, तरी सुद्धा प्रशासन गप्पच आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here