Advertisements
गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर पोलिसांकडून दारूच्या कारवायांना कमालीचा वेग आल्याचे चित्र असून दररोज दारू तस्करांचे मुस्के आवळले जात आहे.ठिकठिकाणी नाकेबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.याच श्रेणीत गडचांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या कवठाळा येथे 18 जून रोजी सापळा रचून घुग्गुस येथील प्रेमसींग टाक नामक 25 वर्षीय युवकाला दारूची वाहतुक करताना अटक करण्यात आली असून याच्याकडून 96 नग देशी दारूच्या बॉटल किंमत अंदाजे 20 हजार आणि एक स्विफ्ट कार किंमत अंदाजे 3 लाख 50 हजार असा एकूण 3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर ची कारवाई ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली asi शकील अंसारी,npc धर्मराज मुंडे यांनी केली असून एका आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.