ख्वॉजा मोईनोद्दीन चिश्तींचा अपमान असह्य, टिव्ही एंकर “अमीष देवगन” च्या त्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट, कोरपना, गडचांदूर येथील विविध मुस्लिम संघटनांकडून ठाणेदारांना निवेदन, कारवाईची मागणी

0
31
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अख्ख्या जगात अनेकांचे श्रद्धास्थान असलेले अजमेरच्या धरतीवर विराजमान सुफी संत “हजरत ख्वॉजा मोईनोद्दीन चिश्ती रहेमतुल्ला अलैह” यांच्याबद्दल टिव्ही एंकर अमीष देवगन यांनी अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याने मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे.ख्वॉजा गरीब नवाज़ विषयी अशाप्रकारे उदगार काढून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.देशभरात या टिव्ही एंकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व गडचांदूर येथील गरीब नवाज़च्या चाहत्यांनी एकत्र येऊन ठाणेदारांना निवेदन दिले.हज़रत टिपू सुलतान फाऊंडेशन,नुरानी बहुउद्देशिय युवा मंच शाखा गडचांदूर,नासीर खान अफजल खान गडचांदूर तसेच कोरपना येथील ख्वॉजा गरीबं नवाज विचार मंच आणि मुस्लिम जमातीच्या वतीने दोन्ही ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.अमीष देवगनच्या खंत व्यक्त केल्याने मुस्लिम समाज भावना संतुष्ट नसून अशा समाज कंटकांवर कडक कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात आल्याचे यावेळी पहायला मिळाले हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here