Advertisements
चंद्रपूर – चंद्रपुर जिल्ह्यातील धनगर ,गोल्ला,गोलदर कुरमार समाजातील मेंढ़पाळ बांधव टाळेबंदी मुळे अडकून होते त्यांना लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात आपले जनावर चारण्यासाठी जाण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी धनगर जमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाड़े यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना धनगर जमात संघटनेच्या वतीने दि.02 जुन 2020 रोजी निवेदन देण्यात आले होते संघटनेच्या प्रयत्नाला यश मिळाले असुन मेंढपाळ बांधवांचा जनावर चारण्यासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असुन त्यांच्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करुण त्यांना गडचिरोली जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.मेंढपाळ बांधव परिवाराच्या उपजिविके साठी बकरी,मेंढ़या इत्यादी चे पालन करतात लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात ते जनावर चारण्यासाठी दरवर्षी नेतात आणि त्यांच्या सोबत तिथेच वास्तव्य करीत असतात पण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव मुळे टालेबंदी घोषित करण्यात आली होती जिल्हाबंदी असल्यामुळे मेंढपाळ बांधव जनावर चारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जाऊ शकत नव्हते हा मुद्दा लक्षात येताच धनगर जमात संघटने च्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असुन जिल्हाधिकारी यांच्या वतिने मेंढपाळ बांधवांच्या प्रवासा बाबतचे मंजूरीचे दि.08 जुन 2020 रोजी पत्रक निघाले आहे त्यामुळे धनगर जमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाड़े,उपाध्यक्ष तुषार मार्लावार ,उपाध्यक्ष वासुदेव आस्कर , उपाध्यक्ष साईनाथ बुच्चे, सचिव प्रवीण गीलबिले , रामकुमार आक्केपल्लीवार, पवन ढवळे ,धनंजय बोडे यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहे.