वीज बिल पूर्णतः माफ करावे आमदार जोरगेवार यांची उर्जामंत्र्यांना मागणी

0
33
Advertisements

चंद्रपूर – कोरोनामूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सलग तिन महिणे लॉकडाऊन पाळण्यात आल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. अशात कुटुंबाचा उदरर्निवाह करण्याचे मोठे आवाहण नागरिकांपूढे आहे. यातच भर म्हणून महावितरणच्या वतीने तिन महिण्यांचे विद्यूत बिल नागरिकांच्या घरी पाठविले आहे. आर्थिक संकटात असतांनाच आलेले हे विज बिल भरायचे कसे असा प्रश्न नागरिकांपूढे पडला असून तो अडचणीत सापडला  आहे. त्यामूळे सध्याची त्याची आर्थिक स्थिती पाहता लॉकडाऊन काळातील तिन महिण्यांचे विज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
संपुर्ण देश कोरोनाशी लढत आहे महाराष्ट्रात तर कोरोनाचा अधिक उद्रेक जाणवत आहे. याचा परिणाम राज्यातील इतर जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यावरही झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. संध्या संचारबंदी शिथील करण्यात आली असली तरी मागील तिन महिणे संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन राहल्याने नागरिकांचा रोजगार गेला आहे. चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा असल्याने कामगारांची संख्या येथे अधिक आहे. मात्र लॉकडाऊन काळात औद्योगीक क्षेत्रासह बांधकाम क्षेत्रही बंद राहील्याने कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे. त्याच बरोबर आँटो, ट्रँक्सी चालक, छोटे व्यापारी, यांचे व्यवसायही लॉकडाऊन काळात चांगलाच प्रभावीत झाला आहे.
अशात आता विद्यूत विभागाच्या वतीने नागरिकांना लॉकडाऊन काळातील तिन महिण्यांचे एकत्रीत एँवरेज बिल पाठविण्यात आले आहे. त्यामूळे पहिलेच आर्थीक संकटात असलेल्या नागरिकांपूढे विज बिलाचे नवे संकट उभे झाले आहे. त्यामूळे विज विभागाप्रति नागरिकांमध्ये रोष आहे. आज घडीला चंद्रपूरातील संचारबदी शिथील असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामाला सुरुवात झाली आहे. मात्र लॉकडाऊन काळातील तिन महिण्यांची आर्थिक पोकळी भरुन काढण्यासाठी वेळ लागणार आहे. अशात नागरिकांकडून तिन महिण्यांचे एकत्रीत बिल वसूलने अन्यायकारक असून लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here