शहराचा विकास निव्वळ “घोड्यावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार”, विशिष्ट वार्डातच नागरिक राहतात का ? समतोल विकासाचा फज्जा, नगरसेवक सुहेल अलींचा आरोप.

0
211
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रं. 2,13,16,17,यात नागरिक राहत नाही का ? विशिष्ट वार्डात जर विकास कामे होत असेल तर समतोल विकासाचे काय ? नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्याचा हेतु काय ? अविकसित वार्डात अनेक समस्या आ वासुन उभ्या असताना संबंधित अधिकार्‍यांनी किती वार्डात भेटी दिल्या ? अविकसित व समस्याग्रस्त वार्डात नागरिक वास्तव्य करत नाही का ? अशा प्रश्नांचा भडीमार करत “शहराचा विकास निव्वळ “घोड्यावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार” अशाप्रकारे उपहासात्मक आरोप कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सैय्यद सुहेल आबीद अली यांनी नगरपंचायतवर करत शहराच्या विकासा संबंधी लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे मत सुहेल अली यांनी News34 प्रतिनिधी सोबत चर्चेदरम्यान व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी,मागास क्षेत्रातील तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत दर्जा व विशेष महत्व देऊन गावचा विकास व्हावा,तालुक्याच्या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी तालुकास्तरीय ग्रामपंचायतीच्या दर्जा वाढ करून नगरपंचायतीत रूपांतर झाले.मात्र या सर्व घडामोडी नंतर कोरपना येथील एक हाती सत्ता असलेल्या नगरपंचायत मध्ये शासनाच्या विविध योजनेतंर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून गत 4 वर्षात नगर उत्थान,14 वित्त आयोग, नवीन नगर विशिष्ट विकास, घनकचरा व्यवस्थापन,हरीत महाराष्ट्र,वृक्ष लागवड अशा विशिष्ट कामांसाठी शासनाने मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.मात्र नियोजनाच्या अभावामुळे विकास कामांवर पारिणाम झाला.वृक्ष लागवडीवर लाखोंचा खर्च होऊन ही हरीत महाराष्ट्र कार्यक्रमाचे तीनतेरा वाजले.मोठा गैरव्यवहार झाल्याने लाखोंचा निधि फस्त झाल्या नतंर डिपाझीट रक्कम जप्त करून कत्रटंदारावर कारवाई करण्याची नामुशकी सत्ताधाऱ्यांवर आली.गावाचा समतोल विकास व्हावा म्हणुन शासनाने विविध स्त्रोतातून निधि उपलब्ध करून दिला मात्र हा निधि विशिष्ट वार्डात व विशिष्ट ठेकेदारामार्फत होत असल्याच्या अनेक तक्रारी असताना चौकशीवर पांघरून घातले जात आहे.ज्याची अनेक वर्षांपासून सत्ता आहे त्यांनी वार्ड क्रं. 2 मध्ये ग्रामपंचायत पासून नगरपंचायतीच्या 4 वर्षात 1रुपया ही खर्च केला नाही. पिण्याचे पाणी रस्ता,नाली मूलभूत व पायाभूत विकासाचे एकही काम केले नाही म्हणून तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार अँड.संजय धोटे यांनी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.मात्र नगरपंचायती चा विषेश ठेकेदारचा असावा म्हणून मोह आवरता आला नाही.गत 4 वर्षात विशिष्ट ठेकेदारच 70% कामे करीत असल्याने अनेकांनी शंका उपस्थीत केल्या मात्र नगरपचांयत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा आदेश डावलून सर्वसाधारण सभेचे कामकाज आडीयो,व्हीडीओ संकलन करा म्हणत 2 वर्ष लोटले मात्र जाहिरात टेंडर काढण्यासाठी वेळ मिळाला नाही.विविध समित्या कागदावरच असून नगर चा कारभार अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहे.2 कोटींचे विकास कामे निव्वळ ठेकेदाराला लाभ देण्यासाठी न्यायलयात अडकल्याने विकासाला खीळ बसल्याची खंत सुहेल अली यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here