चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी विदर्भात मोठ्या प्रमाणात होत आहे.
आजची तरुणाई सुगंधित तंबाखूद्वारे बनलेल्या खर्रा याच्या विळख्यात गेली आहे त्यामुळे तरुणाईतच कॅन्सरचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात खर्रा ही वस्तू नागरिकांची पहिली पसंत आहे, सकाळची न्याहारी घेतली नाही तरी चालले पण खर्रा मात्र खाणे हा तरुणाईचा नित्यक्रमच बनलेला आहे.
लॉकडाउन मध्ये आज पान टपरी बंद असल्या तरी खर्रा मिळत नाही हा गैरसमज आहे, खर्रा मोठ्या प्रमाणात मिळत आहे मात्र त्याचे भाव आज लॉकडाउन मुळे वाढले आहे.
अवैध दारू तस्करी पेक्षा सुगंधित तंबाखूची तस्करीही मोठी आहे, यावर अजून काही मोठी कार्यवाही करण्यात आली नाही, याच कारण म्हणजे एकच अर्थकारण, हफ्तेखोरी आहे.
जे अर्थकारण करून ही वस्तू जिल्ह्यात दाखल करायला मदत करतात ते मात्र आपल्या मुलांना या व्यसनाच्या विळख्यात टाकत आहे अशी अनेक उदाहरणे चंद्रपूर शहरात आहेच.
सुगंधित तंबाखूचा व्यापार करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे.
वसीम नामक व्यापारी हा वयाने मोठा नाही पण काम मात्र खूप मोठे कमी वयातच या तस्करीत मोठे नाव कमावले आहे.
बाकी व्यापारी जैसुक, हरीश, नूतन, जितू, सदानंद व कलाम हे सर्व आज सर्रासपणे सुगंधित तंबाखूची तस्करी करतात.
आज आपल्या तरुणाईला कॅन्सरच्या विळख्यातून वाचवायचे असेल तर या सर्व व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी.
चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार, हे आहे ते खरे सुत्रधार
Advertisements