प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्गुस – घुग्गुस येथे शिवसेना व युवासेनेच्या वतिने रक्तदान शिबीराचे आयोजन दिनांक १७/६/२०२० ला सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत घुग्गुस ग्रामपंचायत जवळील बालाजी लाॅन येथे करण्यात आले होते. यावेळी 50 रक्तदात्यांनी स्वयंफुर्तीने रक्तदान केले.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रक्ताची कमतरता भासु नये या उदात्त उद्देश्याने व मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार घुग्गुस येथील शिवसेना व युवासेनेच्या वतिने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबीरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुर येथुन चमु बोलाविण्यात आली होती.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन चंद्रपुर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पन करुन केले यावेळी घुग्गुस शिवसेना शहर प्रमुख बंटीभाऊ घोरपडे, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, उपशहर प्रमुख योगेश भांदककर, चेतन बोबडे, बाळु चिकनकर प्रभाकर चिकनकर ग्रापं सदस्य घुग्गुस, रघुनाथ धोंगळे, गणेश शेंडे, गजानन बांदुरकर, अजय जोगी, सोनू ठाकुर,रोहीत नलके, कोमल ठाकरे सौ.केतकी बंटी घोरपडे, सौ. वैशाली बाळु चिकनकर, सौ. संगीता देवराव बोबडे व शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.