Advertisements
चंद्रपूर – चंद्रपुरातील प्रसिद्ध रंगकर्मी अजय धवने यांनी विविध कलावंतांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकण्यासाठी कलावंतांची व्यक्तिचित्रणे रेखाटण्याचा अभिनव उपक्रम फेसबुकवर सुरू केलाय . या सदरात रोज संध्याकाळी ते एका कलावंताचे व्यक्तिचित्रण ते सादर करतात. अवश्य भेट द्या अजय धवने यांच्या फेसबुक अकाऊंट वर आणि आस्वाद घ्या उपक्रमाचा !
चंद्रपूर जिल्ह्यातील व बाहेरील कलावंत व्यक्तिविशेष यांची माहिती सुजाण नागरिकांना व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू केला अशी माहिती नाट्यकर्मी अजय धवने यांनी news34 सोबत बोलताना दिली, आपल्याला या सदराबद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास या लिंकवर जाऊन त्या माहितीचा आस्वाद आपण घेऊ शकता.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2964841663564471&id=100001160001268