जिल्ह्यात आज 2 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण बाधित 54 तर उपचार सुरू 29

0
40
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील एका बावीस वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज बुधवार दिनांक १७ जून रोजी आलेल्या या एका पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची आतापर्यंतची संख्या ५४ झाली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह बाधितांची संख्या 29 आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहिती नुसार हा २२ वर्षीय युवक मुंबई येथून १२ जून रोजी गांगलवाडी येथील शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये होता. लक्षणे दिसून आल्यानंतर १५ तारखेला ब्रह्मपुरी कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. १६ जुन रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. १७ जून रोजी युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून या पॉझिटिव्ह बाधितासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या ५४ झाली आहे.
तत्पूर्वी काल १६ जून रोजी पॉझिटिव्ह बाधिताची संख्या एकूण ५ झाली होती. यामध्ये नवी दिल्ली नजीकच्या गुडगाव या शहरातून चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या ३२ वर्षीय व्यक्ती, राजुरा येथील साई नगर भागातील २७ वर्षीय युवक, बल्लारपूर शहरातील टिळक नगर भागातील आई आणि मुलगी, ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील मुंबईवरून आलेल्या १९ वर्षीय युवकाचा समावेश होता.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) आणि १७जून ( एक बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ५४ झाले आहेत.आतापर्यत २६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५४ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 29 झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here