चंद्रपूर – 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाचा वारसा आजही शिवसेना घेऊन चालत आहे, राज्याच्या राजकारणात आज शिवसेनेने मजल मारली.
राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आज स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले आहे.
कोरोना विषाणूच्या महामारीत सुद्धा उद्धव ठाकरे नागरिकांना संयमाने व शासनाच्या दिशा निर्देशाचे पालन करण्याचं वारंवार आवाहन करीत आहे.
या समाजकारणाचं उत्तम उदाहरण आज चंद्रपूर शहरात घडलं, युवा सेना शहर प्रमुख अक्षय अंबिरवार यांनी आपल्या कार्याची पावती दिली.
शहरातील पठाणपूरा भागात राहणारे धकाते कुटुंबियातील 5 वर्षीय आयुष्य हा अचानक घरून फिरता फिरता बाहेर गेला, आयुष्य हा मूकबधिर असल्याने कुणालाही काही सांगू शकत नव्हता व त्याच्या हातवाऱ्याला पण कुणी समजू शकत नव्हतं.
इतक्यात वाटेतच युवा सेना शहरप्रमुख अक्षय अंबिरवारला ही बाब कळली, क्षणाचाही विलंब न करता, आयुष्य च घर कुठे याबाबत माहिती घेतली परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.
अक्षय ने ऑनलाइन असलेल्या जगातील तंत्रज्ञानाचा वापर करीत आयुष्य चे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केले.
बघता बघता काही वेळातच आयुष्य च्या आईचा कॉल अक्षय च्या दूरध्वनीवर आला.
अक्षय ने याबाबत शहर पोलिसांना सूचना दिली व आलेल्या कॉलची माहिती देत, संपूर्ण बाबीची खातरजमा केल्यावर पोलिसांच्या समक्ष आयुष्य ला त्याच्या आईजवळ परत केले.
देशात आजही लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय आहे, लहान मुलांचा वापर भीक मागण्यात ही टोळी करीत असते, परंतु आज अक्षय सारखे अनेक युवक समाजात आहे म्हणून वाईट विचाराचे व्यक्ती लहान मुलांजवल फिरकू शकत नाही.
आज अक्षय ने जे कार्य केले तो समाजाला नवा संदेशच आहे.
आधी शिवसेना म्हटलं की वेगळेच विचार नागरिकांच्या मनात येत होते मात्र आज हे सगळं अपवाद ठरले आहे, चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवा सेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे यांनी समाजकारणात रस असलेल्या युवकांची सेना तैयार केली ज्यामुळे आज तेच युवक समाजकारणात सक्रिय झाले आहे.