चंद्रपूर – राज्यात 2012 पासून सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आला असलं तरी राज्यात ही वस्तू सहजरीत्या उपलब्ध होत आहे.
याच कारण म्हणजे आजही या प्रतिबंधित वस्तूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे, चंद्रपूर जिल्ह्यात धूम्रपान, तंबाखू, गुटखा व खर्रा शौकिनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
लॉकडाउन काळात सुद्धा सुगंधित तंबाखू तस्करांनी या व्यवसायात चांगली कमाई केली अशी माहिती आहे.
जिल्हाबंदी असतांना हा तंबाखू जिल्ह्यात दाखल कसा होतो? या प्रश्नांची जेव्हा आम्ही चौकशी केली तर धक्कादायक माहिती समोर आली, जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास अत्यावश्यक वाहने दाखल होतात त्या वाहनातच हा सुगंधित तंबाखू जिल्ह्यात पोहचतो.
विशेष म्हणजे हा माल गोदामात जात नाही तर आधीच एकेठिकाणी संपूर्ण माल खाली करून त्याला जिल्ह्यातील विविध भागात पोहचविले जाते.
प्रशासनाने या तस्करीवर निर्बंध घालने आवश्यक आहे कारण या सुगंधित तंबाखूमुळे युवा पिढी कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात जात आहे.
(क्रमशः)
अत्यावश्यक सेवांच्या वाहनातून सुगंधित तंबाखूची जोमात तस्करी, सुगंधित तंबाखूमुळे युवापिढी कॅन्सरच्या विळख्यात
Advertisements