घंटागाडी कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप, उपाध्यक्ष जोगींच्या हस्ते अत्यावश्यक वस्तू वाटप

0
99
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” व्हायरसने अख्ख्या देशाला वेठीस धरले असून देशवासी अक्षरशः हैराण झाल्याचे चित्र आहे.दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच कोरोनाच्या युद्धात केंद्र व राज्य सरकारची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.याच श्रेणीत लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी शहरातील कचरा गोळा करून घंटागाडीच्या सहाय्याने नियोजित ठिकाणी डंपिंग करणार्‍या गडचांदूर नगरपरिषदेतील घंटागाडीचे चालक व कामगारांच्या पाठीवर न.प.चे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद जोगी यांनी कौतुकाची थाप देत यांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे.यावेळी भावराव खामनकर,मारोती गोरे,प्रमोद खामनकार,दीपक खरवडे, गजानन सातपूते, मनोहर गोरे,किंगरे यांची उपस्थीती होती.”कोरोना” संकट आल्यापासून शरद जोगी हे सतत नागरिकांना मास्क,धान्य कीट,सॅनिटाजर अशा वस्तुंचे वाटप करत आहे हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here