मृतक सलुन व्‍यावसायीक स्‍वप्‍नील चौधरी यांच्‍या कुटूंबीयांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले सांत्‍वन

0
98
Advertisements

चंद्रपूर – 15 जुन 2020 रोजी समतानगर (उर्जानगर) येथील सलुन व्‍यवसायीक स्‍वप्‍नील चौधरी यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळुन आत्‍महत्‍या केल्‍याची घटना घडली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिका-यांसह स्‍वप्‍नील चौधरी यांच्‍या कुटूंबीयांची भेट घेत त्‍यांचे सांत्‍वन केले. यावेळी भारतीय जनता पार्टी तर्फे मृतकाच्‍या कुटूंबीयांना अर्थसहाय्य प्रदान करण्‍यात आले.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतक स्‍वप्‍नील चौधरी यांच्‍या कुटूंबीयांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाला प्रस्‍ताव सादर करण्‍याबाबत जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करण्‍यात येईल असे सांगीतले. मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन मृतकाच्‍या कुटूंबीयांना 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांना सुध्‍दा ई-मेल द्वारे विनंती केली आहे. तसेच लॉकडाउनमुळे हेअर कटींग सलुन व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे नाभीक समाज बांधवांवर आर्थिक संकट कोसळले असल्‍यामुळे सदर व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी सुध्‍दा आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व जिल्‍हाधिका-यांकडे केली आहे.

यावेळी भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस देवराव भोंगळे, भाजपा नेते रामपाल सिंह, उपमहापौर राहुल पावडे, जि.प. सदस्‍या वनिता आसुटकर, नामदेवराव आसुटकर, भाजपा तालुका अध्‍यक्ष हनुमान काकडे, अतुल पोहाणे, नाभीक समाजाचे रविंद्र येसेकर, गजानन चौधरी, रवी हनुमंते, देवानंद वाटकर, पुरुषोत्‍तम किर्तने,  राजु कडवे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here