तुम्हाला आरोपी करणार नाही 10 हजार द्या, सहायक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक

0
111
Advertisements

वरोरा – वरोरा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश खाडे यांना लाचलुचपत विभागाकडून दहा हजार रुपयाची रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

तक्रार करता चंद्रपूर येथील रहिवासी असून मागील दोन दिवसापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे खोट्या आरोपाखाली बंदी बनवण्याची भीती दाखवत पैशाची मागणी सतत करत होते. फिर्यादी आपल्या गाडीने चंद्रपूर वरून नागपूरला जात असताना वरोरा येथे अपघात केल्याच्या कारणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी अडवले होते त्यानंतर पैशाची मागणी करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी ॲम्बुलन्स ड्रायवर मंगळवारी वरोरा येथील बोर्ड चौकामध्ये दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु फिर्यादीला या लाचखोर अधिकाऱ्याला खोट्या आरोपाखाली पैसे देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून आपबीती कहानी सांगितले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने गुप्त टीम तयार करून लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांना रंगेहात दहा हजार रुपये रोख रक्कम घेताना बोर्ड चौक येथे अटक करण्यात आली. एकीकडे covid-19 च्या लोक डाऊन मध्ये पोलिस जीवाची पर्वा न करता अहोरात्र लढत आहे तर दुसरीकडे अवैधरित्या पैसा कमावण्याच्या नादात जनसामान्य लोकांना वेठीस धरत आहे.
जिल्ह्यातील जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कठोर कारवाई करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे.

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले सह अजय बागेसर, पो.का. रविकुमार ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, व चालक दाभाडे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here