चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच अर्धशतक, जिल्ह्यात आज 4 कोरोनाबधित रुग्णाची भर, ऍक्टिव्ह 27 तर एकूण 52 रुग्णांची नोंद

0
108
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी आणखी तीन नागरिक कोरोना बाधित आढळले आहे. आज सकाळी ब्रह्मपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सायंकाळी राजुरा शहर एक व बल्लारपूर शहर दोन असे एकूण चार पॉझिटीव्ह मंगळवारी आढळल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या ५२ झाली आहे.
आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये राजुरा येथील साई नगर भागातील २७ वर्षीय युवक कोरोना बाधित ठरला आहे.हा युवक अहमदाबाद वरून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता.
तर बल्लारपूर शहरातील टिळक नगर भागातील वडील आणि मुलगी सुरत शहरातून आल्यानंतर गृह अलगीकरणात होते. काल घेण्यात आलेले या तिघांचेही स्वॅब आज पॉझिटीव्ह ठरले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील मुंबईवरून आलेल्या १९ वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला लक्षणे दिसल्यानंतर ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. १५ जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे आज सकाळी पुढे आले आहे.त्यामुळे आजच्या एकूण ४ बाधीतांमुळे चंद्रपूर जिल्हयातील बाधीत रुग्णाची संख्या ५२ झाली आहे. सर्व चारही बाधीताची प्रकृती स्थिर आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) १४ जून ( एकूण ३ बाधीत ) १५ जून ( एक बाधीत ) १६ जून ( एकूण ४ बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ५२ झाले आहेत.आतापर्यत २५ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५२ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २७ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here