Advertisements
चंद्रपूर – दाताला, midc व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पुलाला भारतरत्न राजीव गांधी उड्डाणपूल नाव द्या अशी मागणी राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना माजी खासदार पुगलिया यांनी पत्राद्वारे केली आहे.
मागील 2 वर्षांपासून चर्चित असलेल्या इराई नदीवर पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे, त्या पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही व वणी (यवतमाळ), midc, दाताला, नवीन चंद्रपूर हा भाग सहज जोडण्यात येणार आहे.
या पुलाला भारतरत्न राजीव गांधी उड्डाणपूल असे नाव द्या अशी मागणी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी केली आहे.