Advertisements
चंद्रपूर – वर्ष 2012 पासून राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आला होता परंतु त्यानंतर सुद्धा हा सुगंधित तंबाखू अवैधरित्या राज्यात दाखल होतच आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी करण्यात आली परंतु या अवैध दारू सारखं जास्त प्रमाण सुगंधित तंबाखूचे आहे यावर सध्यातरी काहीच नियंत्रण आले नाही.
शरीराला हानिकारक असलेला हा सुगंधित तंबाखू शहरात मोठ्या प्रमाणात विकल्या जातो, कारण नागरिकांना खर्रा व गुटख्याची सवय पडली आहे.
हा सुगंधित तंबाकू आपल्या जिल्ह्यात दाखल होतोच कसा? हा मोठा प्रश्न आहे.
लॉकडाउन काळातच चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूने कोट्यवधींची उलाढाल केली अशी माहिती समोर आली आहे, सुगंधित तंबाकू वितरकांवर कारवाई ही फक्त नाममात्रच होते अजूनही अन्न व औषध विभागाच्या हाती मोठा मासा गळाला मिळाला नाही.
(क्रमशः)