अविवाहित युवतीला लग्नाचे आमिष देत शारीरिक शोषण, 3 दिवसानंतर गुन्हा दाखल, मनसे महिला जिल्हाध्यक्षाचा पुढाकार

0
226
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपुरातील विवाहित पुरुष प्रमोद दुबे यांनी एका अविवाहित युवतीला सतत लग्नाचे आमिष देत तिचे शारीरिक शोषण केल्याची बाब उघडकीस आली आहे.

पीडित 29 वर्षीय ही युवती ब्रह्मपुरी तालुक्यातील रहिवासी आहे, सदर विवाहित युवक हा चंद्रपुरातील पोलीस क्वार्टर मध्ये राहतो.

Advertisements

मागील 9 महिन्यापासून युवकाने लग्नाचे आमिष देत युवतीचे शारीरिक शोषण केले, यामध्ये ती युवती गर्भवती झाल्याने तिचा गर्भपात सुद्धा प्रमोद दुबे याने करवून घेतला.

प्रकरण अंगावर येत असल्याचे बघता प्रमोदने त्या युवतीच्या घरी जाऊन तिच्या गळ्यात हार टाकत, लग्नाचे नाटक केले व तिला चंद्रपुरात आणले, त्यानंतर त्या युवतीला घरी घेऊन न जाता शहरातील एका हॉटेलमध्ये ठेवले व सतत तिचे शोषण करीत गेला.

ती युवती प्रमोदला घरी नेण्याची विनंती करीत होती परंतु त्याने त्या युवतीजवल मी विवाहित आहो म्हणून तुला घरी नेऊ शकत नाही ही बाब सांगितली व तिला मूल रोडवर नेत सोडून दिले.

विशेष म्हणजे ती युवती पुन्हा गर्भवती आहे, युवतीला न्याय मिळावा म्हणून या प्रकरणाची तक्रार करण्याकरिता तिने रामनगर पोलीस स्टेशन गाठले परंतु युवतीचे काही न ऐकता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करू असे सांगितले, त्याक्षणी पोलीस स्टेशनला मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड दाखल झाल्या युवतीने सदर प्रकरण गायकवाड यांना सांगितले असता गुन्हा का दाखल झाला नाही याबाबत पोलिसांना जाब विचारला परंतु त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही.

गायकवाड यांनी त्या युवतीला सोबत घेत जिल्हा पोलिस अधीक्षक रेड्डी यांची भेट घेत प्रकरणाचे गांभीर्य सांगितले व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ गुन्हा नोंद करण्यास पोलिसांना निर्देश दिले.

तब्बल 3 दिवसांनी प्रमोदवर 376 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, विशेष म्हणजे आरोपी प्रमोद हा पोलिसांचा मुलगा असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असा थेट आरोप त्या युवतीने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here