गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
नरेंद्र मोदी सरकारच्या 2 वर्षपूर्ती निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियानाला कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील प्रभाग क्रं.2 मधून सुरवात करण्यात आली असून यात मोदी सरकारने देशातील जनतेच्या कल्याणासाठी घेतलेले लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच या सरकारच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला याचा सर्व्हे करणे तसेच प्रत्येक बूथ प्रमुखांकडून कुटुंब सर्वेक्षण अहवाल जनतेकडून भरून घेतला जाणार आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,माजी आमदार अँड.संजय धोटे,अभियान संयोजक देवराव भोंगळे,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सदर अभियान राबविण्यात येत आहे.तसेच सरकारने गोर गरीब जनतेच्या हितासाठी प्रधानमंत्री अटल पेंशन योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना,प्रधानमंत्री जनऔषधी योजना,जनधन योजना,महिलांकरीता उज्वला गॅस योजना अशाप्रकारे अनेक योजना राबवून देशातील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न केले आहे.या अभियानाद्वारे मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती गडचांदूर न.प.भाजपचे नगरसेवक, संयोजक अरविंद डोहेसह शहरातील इतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संपूर्ण 23 बूथ प्रमुख घरोघरी जाऊन देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरच्या अभियानात सोशल डिस्टंसिंग,मास्क,सॅनिटायजर अशाप्रकारे शासन नियमांचे पालन करण्यात येत असून अनेक लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने अभियानाला जनतेकडून उत्तम व भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
गडचांदूर भाजपातर्फे जनसंपर्क अभियानला सुरूवात, अभियानाला भरभरून प्रतिसाद
Advertisements