विद्युत विभागाचा नागरिकांना शॉक, 3 महिन्याचे वीज बिल नागरिकांच्या दारी

0
54
Advertisements

चंद्रपूर – कोरोना विषाणूमुळे देशात व राज्यात लॉकडाउन असताना महावितरणने घरोघरी जात विद्युत मीटरचे रिडींग घेणे टाळले असले तरी नागरिकांना अंदाजे बिल पाठविण्यात आले होते.

आता तब्बल 3 महिन्यांनंतर महावितरण द्वारे चंद्रपूर शहरातील नागरिकांना जोरात शॉक द्यायचे काम सुरू झाले आहे, आता नागरिकांना 3 महिन्याचे विद्युत बिल येणे सुरू झाले आहे, सर्वसामान्य नागरिकांना वाटत होते की सरकार काही प्रमाणात वीज बिल माफ करेल नाहीतरी वीज बिलात सूट मिळेल परंतु असे काही झाले नाही.

नागरिकांना आता एकाचवेळी 10 ते 20 हजार रुपयांचे बिल मिळाले आहे ते सुद्धा एक महिन्याच्या मुदतीत भरणा करायचे आहे, जिल्ह्यात आर्थिक तंगीमुळे तब्बल 6 नागरिकांनी आत्महत्या केल्या असे असताना आता या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावितरणने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here