गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना या तालुक्याच्या ठिकाणासह औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे गडचांदूर, नांदा,बिबीसह ग्रामीण भागातील 50 ते 60 गावातील अत्यंत गरीब,गरजू कुटुंब केंद्र शासनाच्या मोफत धान्य योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र असून रेशनकार्ड नसलेल्यांना ही सदर योजनेचा लाभ द्या अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे सैय्यद आबीद अली यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे केली आहे.सदर योजनेला 3 महिन्यांचा कालावधी लोटत असून महसुल विभाग व ग्रामसेवकद्वारे यादी तयार करण्यात आली.ज्यांच्याकडे कार्ड आहे अशांना मासिक नियतन नुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंब सवलती दरात तसेच मोफत धान्याचा एप्रील,मे महिन्यात लाभ घेतला.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक गरीब व गरजू कुटुंब मोफत धान्याच्या लाभापासून वंचित राहीले.मदतीचा वेग मंदावला असून शेतीच्या कामाशिवाय इतर रोजगार अक्षरशः ठप्प पडले परिणामी घरात अन्नधान्याची चण चण भासत आहे.अनेक कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही आणि तालुक्यात झालेल्या तपासणीनुसार 54 गावातील 2768 कुटुंब व 9 हजार युनिट असलेली कुटुंब धान्याचा लाभ मिळाला नाही.कोरपना शहरातील 90 कुटुंब पिपर्डा व कुसळ येथील अंदाजे 39 कुटुंब यासह 51गावातील अत्यंत गरीब आणि पात्र कुटुंबांना प्रती व्यक्ती 5 किलो याप्रमाणे एप्रिल,मे,जुन तीन महिन्याचे धान्य वाटप करण्याची मागणी आबीद अली यांनी केली आहे.
केंद्रीय योजनेतील मोफत धान्याचा लाभ रेशनकार्ड नसलेल्यांना ही द्या, जनसत्याग्रह संघटनेचे आबीद अली यांची मागणी
Advertisements