चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करांची हद्द ठरली, तस्करांच्या मागे राजकीय पाठबळ, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी एड पारोमिता गोस्वामी यांची गृहमंत्र्यांना मागणी

0
65
Advertisements

चंद्रपूर/ चंद्रपूर जिल्ह्यातील दारूतस्कर आपसात क्षेत्र वाटप करून, जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणीत आहेत. तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाई करावी, या सर्व गोष्टींची सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवर करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य समिती, सदस्य अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
मागील एक आठवड्यापासून विविध समाजमाध्यम आणि वेब पोर्टलवर चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या दारूचा पुरवठा करण्याबाबत दारूतस्करांनी रीतसर रणनीती आखल्याच्या धक्कादायक बातम्या प्रकाशित झाल्या आहेत, याकङे अॅङ. पारोमिता गोस्वामी यांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
जिल्ह्यातील मोठे दारू तस्कर यांनी रीतसर बैठक बोलावून आपापसात तालुका तसेच क्षेत्राचे वाटप केलेले आहे. त्यांच्या या रणनीतीनुसार आखून दिलेल्या तालुका किंवा क्षेत्रात दारूतस्करीचा संपूर्ण “ठेका” त्याच व्यक्तीला राहील. इतर सर्व चिल्लर विक्रेते त्याच्या अधिनस्त राहून अवैध धंदे करतील. ही संपूर्ण रणनीती जिल्ह्यातील काही मोठे राजकीय नेते आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने घडत असल्याचे त्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
काही बातमीदारांनी तालुका आणि क्षेत्राप्रमाणे नावांचे देखील उल्ल्लेख केले आहे. एका पोर्टलनुसार चंद्रपूर येथील लालपेठ क्षेत्रात इलियास, वरोरा- भद्रावतीसाठी बंडू आंबटकर, ब्रम्हपुरी क्षेत्रात प्यारासिंग जुनी, मूल येथे मुन्नासिंग पटवा, चंद्रपूर मध्ये सिकंदरसिंग, घुग्गुस येथे दगड़ीसिंग, असे नावांचे उल्लेख केलेले आहेत.
तर दुसऱ्या वेब पोर्टलनुसार ब्रम्हपुरी क्षेत्रात अवैध दारूविक्रेत्यांना राजकीय पाठबळ देत प्रमुख तस्कारानी गुप्त बैठक घेतल्याची बातमी प्रकाशित केली आहे.
-“माय चंद्रपूर” या फेसबुक पेजवर दि. ११ जून रोजी पत्रकार श्री. लिमेशकुमार जंगम यांनी लिहले आहे कि, अवैध दारू तस्करीमध्ये लालपेठमध्ये R.B, बाबुपेठमध्ये P.J, महाकालीमध्ये E.S, रयतवारीमध्ये S.A, असे लोक अवैध दारूचा पुरवठा करणार असे ठरवण्यात आले आहेत. हे सर्व दारू “ठेकेदारां”ची नावांचे अक्षरे असून, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्याचे हात असल्याचेदेखील लिहले आहे.
वर्धा व गडचिरोलीनंतर २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक दारू तस्करांवर पोलीस प्रशासनाने सक्षमपणे कारवाई केली आहे. मात्र, मागील एक आठवड्यापासून सोशल मीडियातून येणार्‍या बातम्या केवळ अवैध दारूबद्दल नसून, जिल्ह्यात दारू तस्करांच्या गुप्त बैठका व रणनीतीबद्दल आहे. राजकीय नेते आणि काही अधिकार्‍याच्या आशीर्वादाने नवीन दारुमाफिया तयार होण्याचे संकेत आहेत. वेळीच दखल घेतली नाही तर पुढे संघटित गुन्हेगारीचे स्वरूप येईल, असेही अॅङ. गोस्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी उठविण्याचे वारंवार जाहीर केले आहे. जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी अभ्यास समिती गठीत करून अहवाल तयार करण्यात आले. हा अहवाल पालकमंत्रीकडे देण्यात आले आहे, मात्र महाराष्ट्र शासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना ‘जनतेशी बोलून दारूबंदी संबंधी भविष्यात निर्णय घेऊ’, अशी आश्वासक भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. शासनाचे अंतिम निर्णय येण्यापूर्वीची जिल्ह्यातील दारूतस्कर रणनीती आखत आहेत. या कामामध्ये काही नेते मंडळी आणि अधिकारी त्यांना सहकार्य करीत आहेत, हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी आहे, असेही गोस्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here