Advertisements
चंद्रपूर – शहरातील उर्जानगर नेरी परिसरातील समता नगर वार्डातील सलून व्यवसायिक 27 वर्षीय स्वप्नील चौधरी ने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
राज्यात लॉकडाउन नंतर सलून व्यवसायिकांचे दुकाने बंद असल्याने सतत त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे, सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी नाभिक समाज वारंवार सरकारला निवेदने देत आहे परंतु यावर काही तोडगा न निघाल्यामुळे नाभिक सलून दुकांदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले.
या चिंतेने पुन्हा एका सलून व्यावसायिकाचा बळी गेला आतातरी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी दुर्गापूर सलून दुकानदार अध्यक्ष पुरुषोत्तम कीर्तने यांनी शासनाला मागणी केली आहे.