युवासेना जिल्हा चिटणीस मनीष जेठानी यांच्या तर्फे गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप, ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हातून केक कापून मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

0
240
Advertisements

वरोरा –  शिवसेना नेता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यटन व पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या आव्हानावरून १३ जूनला त्यांचा वाढदिवस साजरा न करता कोरोना विषाणू च्या लोकडाऊन काळात गरजू लोकांना मदत करण्याचे आव्हान केले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील युवासेना शिवसैनिकांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविल्याने वरोरा तालुक्यातील युवा सेना कार्यकर्त्यांनी मजरा येथील ग्रामपंचायत मध्ये एका ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हातून केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली. मजरा गावातील गरजू शेतकऱ्यांना कांचनी प्रोडूसर कंपनीचे प्रगत हळदीचे बियाणे व तुरीचे बियाणे पॉकेट गावातील शेतकऱ्यांना व महिलाना मोफत वाटप करण्यात आले. शिवसैनिकानी वृक्षारोपण करून आपल्या नेत्याचा वाढदिवस जिल्ह्यात अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजात नवीन आदर्श निर्माण केला. कोणतेही होल्डिंग व वायफळ खर्च न करता अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने बाळासाहेबांनी सांगितले 80% समाजकार्य 20% राजकारण या संदेशातून शिवसैनिकांनी जिल्ह्यात काम सुरू केल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या अनोख्या उपक्रमाचे आयोजक युवा सेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी तसेच विशेष उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते प्रमुख पाहुणे शिव सेना वरोरा तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे उपस्थित होते या कार्यक्रमात युवासेना उपजिल्हा प्रमुख हर्षल शिंदे,भद्रावती तालुका प्रमुख महेश जीवतोडे, कंत्राटी कामगार सेना तालुका प्रमुख संजय रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा,सुनील दुगड, मजरा ग्रामपंचायत सरपंच मायाताई बोढे, उपसरपंच कौतुक मगरे, ग्रामपंचायत सदस्य कैलास तोंडासे अनिता आत्राम गौश्या गोबाटे, प्रकाश झाडे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
गावातील शेतकऱ्यांनी या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवसैनिकाचे आभार व्यक्त केले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here