मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना फेस सुरक्षा शिल्ड व मास्क वाटप

0
214
Advertisements

चंद्रपूर –  माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर च्या वतीने सामाजिक उपक्रमांचा सप्ताह राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक हा वाढतच आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना चा संसर्ग झालेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता डॉक्टर ,आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस बांधव कोरोना योदधाची जबाबदारी स्वतःचा जीव धोक्यात टाकून बजावत आहे. महाराष्ट्रात कर्तव्य बजावत असताना सर्वात जास्त कोरोनाची लागण ही महाराष्ट्र पोलिसांना झालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमीच महाराष्ट्र पोलिसांच्या बाजूने बोलतात. पोलिसांच्या समस्या राजकीय पटलावर मांडतात. पोलिसांचा आदर व सन्मान करण्याच्या सूचना राजसाहेब नेहमीच महाराष्ट्र सैनिकांना करत असतात. म्हणूनच राज साहेबांचा वाढदिवस मनसे चंद्रपूर च्या वतीने पोलीस बांधवांचे कोरणा पासून संरक्षण व्हावे म्हणून फेस सुरक्षा शील्ड व मास्क वितरीत करून साजरा करण्यात आला आहे. रामनगर पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन, पडोली पोलीस स्टेशन, दुर्गापूर पोलीस स्टेशन, बागला पोलीस चौकी, तसेच ट्रॅफिक पोलिस बांधवांना आदी सर्वांना मनसे पदाधिकाऱ्यांनी भेटी देत फेस सुरक्षा शील्ड व मास्क वाटप करून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. यावेळी महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ सुनीता ताई गायकवाड, मनसे नगरसेवक तथा जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनसे शहराध्यक्ष मनदीप रोडे, ग्रामपंचायत सदस्य तथा मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, महिला जिल्हा सचिव अर्चना आमटे,मनसे शहर सचिव मनोज तांबेकर, मनसे शहर उपाध्यक्ष महेश शास्त्रकार, उपाध्यक्ष महेश वासलवार, मनविसे शहराध्यक्ष नितीन पेंदाम, मनविसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे, करण नायर, शाहरूख अली, राकेश पराडकर,संदीप आरडे, सुयोग धवलकर, मंगेश चौधरी, तुषार येरमे , नितीन टेकाम, अतुल ताजने,चैतन्य सदाफले ,विकास राजपूत, राजेश वर्मा, पियुश धुपे, शैलेश चौबे, वर्षा बोंबले ,संजय फरदे, राहुल लटारे, अमोल भट, शाम मंगाम, अंकित मीसाळ ,सूरज अगडे आदी सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here