गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना नगरपंचायत क्षेत्रात विवीध योजनेंतर्गत वार्ड क्रं.1 येथे रस्ते,नाली अशाप्रकारे बांधकाम सुरू आहे.यामध्ये निकृष्ठ दर्जाच्या मटेरियलचा वापर होत असल्याने सदर बांधकाम अंदाज पत्रकानुसार होताना दिसत नाही परंतु याकडे नगरपंचायत प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत असून शासनाच्या लाखोंच्या निधीला चुना लागत असल्याचे आरोप करत सदर कामावर कोणाचेही अंकुश नसल्याने संबंधीत कंत्राटदार स्वतःच्या मनमर्जीने बांधकाम करीत आहे त्याकरिता सदर कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद मसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.कोरपना ग्राम पंचायतचे रूपांतर नगरपंचायततीत झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी कडून रस्ते,नाली बांधकामासाठी शासन निधी देतात.त्याचप्रमाणे 2019,20 या वित्त वर्षांत विविध योजनेंतर्गत सदर वॉर्डातील बांधकामासाठी निधी मंजुर होऊन कामाला सुरूवात पण झाली मात्र काम अंदाज पत्रकानुसार नसून यासाठी निकृष्ठ दर्जाचे मटेरियल वापरले जात असल्याचा आरोप मसे यांनी केला आहे.विशेष म्हणजे सदर कंत्राटदार हा केवळ नावापुरता असून नगरपंचायतचे काही पदाधिकारी हे काम करीत असल्याचेही आरोप मसे यांनी केला असून सदर कामाची चौकशी करण्याची मागणी मसे यांनी केली आहे.
रस्ते,नाली बांधकामाचा दर्जा निकृष्ठ, शिवसेना तालुकाप्रमुख मसे यांचा कोरपना न.प.वर दुर्लक्षतेचा आरोप करीत चौकशीची मागणी
Advertisements