चंद्रपूर – शिवसेना नेता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यटन व पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात, महानगर प्रमुख मा.प्रमोदभाऊ पाटील, तालुका प्रमुख मा. संतोषभाऊ नरुले, महिला आघाडी च्या शोभाताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश बेलखेडे,युवासेना शहर प्रमुख अक्षय अंबिरवार यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले. यामध्ये -1) मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य,मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज चंद्रपूर युवासेना मध्ये युवती सेना अंतर्गत काही युवतींनी प्रवेश घेतला. 2)गरजू, अनाथ आश्रम संस्थेतील मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम. 3)कोरोना संकट काळात मध्ये सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्यकरीत असल्याबद्दल काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था, “कोरोना योद्धा ” म्हणून सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. 4)त्याचबरोबर युवासेना चिटणीस सागर तुरक,अश्विन देवतळे,मनोज इटकर इ. कार्यकर्ते यांच्या तर्फे समता वार्ड मध्ये वृक्षरोपण आणि मास्क वाटप, घेण्यात आले.5)बालाजी वार्ड येथील भविष्यात इंजिनियर बनायचं स्वप्न बाळगणाऱ्या एका 12विच्या विद्यार्थिनीला निलेश बेलखेडे यांनी संपूर्ण बारावी,जेइइ ची पुस्तके भेट वस्तू देऊन मदत केली. पुढेही तिच्या स्वप्नपूर्तते साठी साथ देणार असा विश्वास दिला. सदर कार्यक्रमाला शिवसेना उपशहर सुरेश नायर, वासिम भाई, विक्रांत सहारे, सुरजघोंगे,विनय धोबे,रोहित नलके युवासेना उप शहर प्रमुख करण वैरागडे, प्रियांश,मंथन वसाड, संकेत बनकर, शिवसेना, युवासेना आदि युवासैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.
युवासेना प्रमुख, मंत्री. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शहरात युवासेना, शिवसेना चंद्रपूरच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमानी साजरा
Advertisements