सहकारी संस्थांच्या घोळांमुळे कर्जमाफी यादीतून नावे गहाळ, शेतकऱ्यांचे अतोनात हाल, कर्जासाठी बँकेची टोलवाटोलवी थांबविण्याची मागणी

0
180
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
शेतकऱ्यांना कर्जपुरवठा आणि कर्जमाफीच्या यादीत मोठ्याप्रमाणात घोळ झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आदिवासी सेवा सहकारी संस्था व विवीध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत कर्ज पुरवठा केला जातो.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 15,16 यावर्षी राबविण्यात आली.यात सभासद असलेले अनेक शेतकरी वंचित राहिल्यामुळे महाराष्ट्र शासनाने नव्याने 2 लाख पर्यंतची कर्जमाफी योजना राज्यात घोषीत करून अंमलबजावणीला सुरूवात केली होती.मात्र अनेक आधार लिंक नसल्याने कर्जमाफी मान्य,अमान्य नोंदी नोंदवायची संधी शेतकऱ्यांना दिली होती.परंतु सध्या देशावर आलेल्या कोरोना व्हायरसमूळे अॉनलाईनची साईट बंद आहे.2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले व 17,18 मध्ये दुष्काळ 50 टक्‍केंच्या आत पीक आणेवारी कमी असलेल्या गावात कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आले होते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिनस्त असलेल्या सेवा सहकारी संस्थेमध्ये 17,18 वित्तीय वर्षात मोठ्याप्रमाणात सभासदांची थकबाकी झाल्याने सेवा सहकारी संस्थांनी आपल्या सोयीसाठी व थकबाकीचे प्रमाण कमी दाखविण्याच्या हेतुने 2018 मध्ये सभासदांना माहिती न देता मूळ कर्जावर साठ टक्के पूरगठन रूपांतर कर्ज दाखवून 30 सप्टेंबर 19 रोजी त्यांना थकबाकीदार न दाखवता रूपांतर केल्याने चालू खातेदार म्हणून कर्जमाफीच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागल्याची बाब विदर्भातील कित्येक सहकारी बँकांनी सोसायट्यांच्या माध्यमातुन हा घोळ केल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला अनेक सोसायट्यांनी ठराव करून बँकेला कमाल कर्ज मर्यादा वाढविण्याच्या हेतूने शेतकरी सभासदांना पूनरगठनाचे कर्ज न देता व थकबाकी दाखवण्याकरिता हा घाट घालुन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे आरोप होत आहे.शेतकऱ्यांना कर्ज द्या म्हणून शासन कितीही घोषणा करीत असले तरी बँकेने मात्र थकबाकीदारांना कर्ज देण्याकडे पाठ फिरवली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विदर्भात हा घोळ झाल्याचे मान्य केले.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी फेक बँक शाखांच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची घोषणा केली.मात्र संबंधित बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतेही पत्र व निर्देश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचा कापूस विक्री झाला नाही,कर्जमाफीच्या घोषणेचे लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही.अशा मनस्थीतीत शेतकरी अडकला वरूण राजाची कृपा झाल्याने बळीराजाने आपली शेती तयार करून बि-बियाणे खतांची जुळवाजुळव करण्यात सुरूवात केली मात्र पदरात पैसाच नसल्याने पुरता वैतागल्याचे चित्र आहे.बँकेच्या घोळामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या,जिल्हा पतपुरवठा व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी उद्दिष्ट दिलेले आहे,मात्र अनेक सहकारी बँकांमध्ये 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा संथ गतीने केला आहे.हंगाम सुरू झाल्याने बँकेकडून शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये कासवगतीने काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे अनेक शेतकऱ्यांना हंगामावर कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या असून सोसायट्यांच्या चुकीमुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना चालू खातेदार दाखवुन दिशाभूल केल्याचे आरोप होत आहे.संकटसमयी शासन शेतकऱ्यांना आधार देण्याच्या प्रयत्नात असले तरी मात्र ग्रामीण भागात व गावपातळीवर शेतकऱ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.अजूनही बरेच शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असून शासनाच्या घोषणेची प्रभावीपणे अंमलबजावणी,थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करण्याची व्यवस्था करावी यासाठी तहसीलदारांना जन सत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अलींसह शिवसेना तालुका प्रमुख अरविंद म्हसे,गजानन बोराडे,संजय सिडाम,विजय कुडमेथे,गजानन पेंदोर,विनोद जुमडे यांनी निवेदन देऊन कर्जमाफीचा घोळ संपुष्टात आणावा व पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करावा,सेवा सहकारी संस्थांमध्ये रूपांतर कर्जाचा लाभ सभासदांनी घेतला नसताना अपात्र ठरवल्या बद्दल चौकशी करावी,बँक शाखा निहाय जिल्हा पतपुरवठा कमिटीने दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे तातडीने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here