गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना”च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या हाकेला साद देत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 13 जून रोजी गडचांदूर येथील नरेश सिनेमा(टॉकीज) येथे राजूरा विधानसभा शिवसेना,युवासेना,महिला आघाडी,भारतीय विद्यार्थी सेना,नुरानी बहुउद्देशीय युवा मित्र मंच व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ता.कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांच्या हस्ते हिंदू ह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व पुजाअर्चना करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.सदर शिबीराला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला असून एकूण 135 रक्तदातांनी रक्तदान केले तर 50 पेक्षा जास्त जणांची रक्तदान करण्याची इच्छा अपूर्ण राहिली.मास्क व सोशल डिस्टंसिंग अशाप्रकारे शासनाच्या नियमांचे पालन करत रक्तदान कार्यक्रम पार पडला.विशेष म्हणजे यात तरुणी व महिलांनी मोठ्याप्रमाणात भाग घेऊन रक्तदान केले.सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.
गडचांदूरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हाकेला अभूतपूर्व प्रतिसाद, 135 जणांचे रक्तदान तर 50 पेक्षा जास्त रक्तदात्यांची संधी हुकली
Advertisements