अवैध दारूची घुग्गुस मार्गे एंट्री, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
27
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस – चंद्रपुर राज्य महामार्गावरील धानोरा फाट्या जवळ चंद्रपुर येथील स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारला रात्री 8 वाजता दरम्यान सापळा रचुन पिक-अप वाहन क्रमांक एम एच ४० बीजी ३२८९ ला थांबवुन तपासणी केली असता त्यात तब्बल २७० पेटी अवैध देशी दारु आढळुन आली.हे पिकअप वाहन जप्त करून घुग्गुस पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले दारुची किंमत २७ लाख व वाहन किंमत ५ लाख असा एकुण ३२ लाखाचा देशी दारुसह मुद्देमाल जप्त केला.वाहन चालक आरोपी कपील रामदास वेलतुरकर (३१) यांचेवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली तर दोन आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातुन घुग्गुस मार्गे चंद्रपुर जिल्ह्यात हे २७० पेटीचे अवैध देशी दारु तस्करीचे वाहन जात होते. घुग्गुस हद्दीतील बेलोरा नदीच्या पुलाजवळ घुग्गुस पोलीसांची नाकाबंदी चौकी असून त्या ठिकाणी चार पोलीस वाहनांच्या तपासणी करीत तैनात असतात. परंतु ही नाकेबंदी पार करुन २७० पेटी अवैध देशी दारु तस्करी करनारे वाहन घुग्गुस हद्दीत येऊन चंद्रपुर जिल्ह्याचे दिशेने निघाले हे मोठे आश्चर्ययाची बाब आहे यावरुन येथील पोलीसांची अकार्यक्षमता स्पष्ट दिसुन येते.हि कारवाही चंद्रपुर स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक जितेंद्र बोबडे, उप पोलीस निरीक्षक विकास मुंडे, पंडीत वर्हाडे,पद्माकर भोयर, नितिन जाधव, अमोल धंदरे, नितिन रायपुरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here