जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात कंत्राटाच घबाड, नोंदणी अस्तित्वात नसलेल्या संस्थेला दिलं कंत्राट, संपूर्ण कंत्राटच नियमांना डावलून

0
148
Advertisements

चंद्रपूर : येथील जिल्हा क्रीडा अधिकाºयांनी कंत्राटदाराला वाचविण्यासाठी चक्क जिल्हाधिकाºयांच्याच डोळ्यात धुळ टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जलतरण तलावाचे कंत्राट देताना देखभाल दुरुस्तीचा सर्व खर्च संबंधित कंत्राटदारांना करणे अपेक्षित असतानाही तब्बल ४६ हजार ३४० रुपयाच्या बिलाचा प्रस्ताव ५ लोव्हेंबर २०१९ ला जिल्हाधिकाºयांकडे पाठवून मंजुरही करून घेतला आहे. त्यामुळे क्रीडा अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून संबंधित कंत्राटदार तसेच क्रीडा अधिकाºयांºयावर जिल्हाधिकाºयांनी कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलामध्ये असलेले जलतरण तलाव कंत्राटदारामार्फत चालविल्या जात असून यासाठी निवीदा काढल्या जाते. मात्र मागील वर्षी येथील कंत्राट देताना जिल्हा क्रीडा अधिकाºयांनी नियम अटींचा भंग करीत इतर जिल्ह्यांनी काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला जलतरण तलावाचे कंत्राट देण्याचा प्रताप केला आहे. एवढेच नाही तर कंत्राट दिल्यानंतर देखभाल दुरुस्तीचा सर्व खर्च संबंधित कंत्राटदारांनी करावयाचा आहे. असे नियम व अटीमध्ये नमूद असतानाही तबब्ल ४६ हजार ३४० रुपयांची दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडून मंजूर करून घेतला आहे. विशेष म्हणजे, दुरुस्तीसाठी लागणाºया साहित्याचे बिलही थातूहमातूर जोडल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे कंत्राट देताना निवीदेतील अटी व शर्तीनुसार संस्था असल्यास नोंदणी प्रमाणपत्र, घटनापत्र व पदाधिकाºयांची यादी तसेच संस्था काळ्या यादीत नसल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा अ‍ॅम्युच्युर अ‍ॅक्वाटिक असोसिएशनचे सचिव यांच्या पत्रानुसार जलतरण तलाव हा संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती काढली असता सदर संस्था मागील अनेक वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. जो नोंदणीकृत क्रमांक या संस्थेचा दाखविण्यात आला तो सुद्धा दुसऱ्या संस्थेचा क्रमांक आहे. सोबतच संबंधित संस्थेला जलतरण चालविण्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र कंत्राट घेताना आवश्यक आहे. मात्र संबंधित संस्थेला भंडारा येथील जलतरण तलाव योग्यरितीने न चालविण्यामुळे ताबा घेऊन कंत्राट रद्द करण्यात आले होते, याचीही माहिती दडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून हे सर्व जिल्हा क्रीडा अधिकाºयांना माहित असूनही त्यांनी जाणून बुजून माहिती दडवून ठेवल्याचा आरोपही केला जात आहे.
जलतरण तलावमधील जे काही दुरुस्तीचे काम असल्यास ते स्वतः कंत्राटदाराने करायचे अशी निविदेत अट आहे परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे व कंत्राटदार महेंद्र कपूर यांनी संगनमत करून सदर दुरुस्तीचे पैसे प्रशासनाकडून वसूल केले, बिलाच्या त्या टिप्पणीवर जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना पुरेपूर माहिती न देता त्यांची सही सुद्धा घेण्यात आली.
याबाबत क्रीडा अधिकारी बोबडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी आधी थातुरमातुर उत्तर डोके नंतर प्रकरण अंगावर येत असल्याचे बघता आम्ही नियमानुसारच कामे केली आहे तुम्हाला जे छापायचे ते छापा अशी प्रतिक्रिया बोबडे यांची होती.
यासंदर्भात जिल्ह्यातील काही पर्यावरण तसेच सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार तसेच जिल्हा क्रीडा अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here