मुख्याधिकाऱ्यांच्या मुलाची कोरोना विषाणूबद्दल पेंटिंगद्वारे जनजागृती

0
103
Advertisements

राजुरा –  कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. सर्व देशांतून हा साथीचा रोग रोखण्यासाठी संचारबंदी राबविण्यात आले आहे. या संचार बंदित सरकार कडून काही निर्बंध लादले गेले आहे. विविध सामाजिक संस्था व संघटना तर्फे सोशल अंतर चे महत्व पटऊन देण्यासाठी प्रबोधन करत आहे. या समजा सेवेत लाहान मुले सुद्धा आपल्या परीने कोरोना या महामारी रोगामुळे होणाऱ्या हानी चे महत्व विविध कलागुना द्वारे सादर करण्यात येत आहे. राजुरा नगर परिषद येथील मुख्यकार्यकारी अधिकारी अर्शीया जुही यांचा मोहम्मद अशाज़ मोहम्मद अशफ़ाक हा 8 वर्षचा मुलगा पेंटिंग काढून जनतेला सोशल अंतर ठेऊन कोरोना वर मात करण्यासाठी पेंटिंग द्वारे सोशल मीडिया वर जनजागृती करत आहे. आई अर्शिया जूही नगर प्रशासन द्वारे कोरोना वर मात करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असून मुलाचे वडिल डॉक्टर मोहम्मद अशफ़ाक सुद्धा रुग्णाची सेवेत आपले योगदान देत आहे. एकंदरीत या कुटुंबातील सर्वच सदस्य आप आपल्या परीने या संकट काळी आपली सेवा करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे. या लहान मुलांच्या छोट्याश्या प्रयत्ना मुळे शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. राजुरा शहरातील नगराध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, सर्व नगर सेवक,पत्रकार एजाज अहेमद, बाबा बेग सुरेश साळवे, मंगेश श्रीरामे सैय्यद जाकिर, बाबा बेग फारुख शेख, श्रीकृष्णा गोरे, मंगेश बोरकुटे, युवा नेते असिफ सैय्यद, फारुख अहमद , शब्बीर पठान, संतोष देरकर, आशीष यमनुवार,स्वप्नील बजुज्वार, सालेम चाऊस भाई तसेच नगर परिषदेतील समस्त कर्मचारी वृंद आणि या सारख्या शहरा तील मान्यवर मंडळींनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here