Advertisements
चंद्रपूर – शहरात अवैध दारू, रेती, सुगंधित तंबाखू नंतर आता देहव्यवसाय जोमात सुरू झाला आहे, आणि हा व्यवसाय शहरातील मोठ्या उच्चभ्रू भागात सुरू आहे.
शहरातल्या रामनगर परिसरातील ब्रह्मानंद अपार्टमेंट मधील एका फ्लॅटमध्ये हा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे, अनेक वर्षांपासून या फ्लॅटमध्ये हा व्यवसाय सुरू आहे परंतु मोठ्या कालावधीनंतर आता ही कारवाई पोलिसांनी केली.
या व्यवसायाची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
या कारवाईत फ्लॅटधारक व 2 महिलांना अटक केली, या कारवाईमुळे रामनगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी दाताला रोड परिसरात देहव्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.