२२ दुकानांवर पालिकेची दंडात्मक कारवाई

0
103
Advertisements

चंद्रपूर – मास्क न लावता खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या २२ दुकानांवर तसेच मास्क न लावता खरेदी करणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई मनपातर्फे सकाळच्या सत्रात करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टंसिंग – दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर पाळण्याच्या नियमांचे मुळीच पालन न करणाऱ्या या दुकानदारांना यापुर्वी ताकीद देण्यात आली होती, मात्र यावर अंमल न करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येत आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी शासनातर्फे पुर्णवेळ लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. दरम्यान परिस्थिती पूर्वपदावर यावी याकरीता मागील काही दिवसांपासुन  यात शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते ५ यावेळेतच दुकाने सुरु ठेवण्यात येत असून उपहारगृहे, खाद्यगृहे, घरगुती खानावळ, स्वीट मार्केट, फरसान सेंटर, चहा नाश्ता सेंटर हे केवळ पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अटीवर सुरु करण्यात आले आहे.
कोरोना आजार संपर्कातून पसरू शकतो, त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अतिशय अनिवार्य आहे. त्यादृष्टीने दुकानमालकांनी ग्राहकांना केवळ पार्सल द्यावे, ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नये,  एकावेळी ५ पेक्षा अधिक लोकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, फिजिकल डिस्टंसिंग – दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर पाळावे, विहित वेळेत दुकाने सुरु व बंद करावे, पूर्णतः स्वच्छता राखावी यासारख्या अटींचे पालन करावयाचे आहे. मात्र काही उपहारगृहे, खाद्यगृहे, हॉटेलचालक या सुचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कारवाई करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here