यवतमाळ जिल्ह्यात युरीया व अन्य खतांचा अपूरा पूरवठा होत असल्याने याची दखल घेऊन खतांचा मुबलक पूरवठा करण्यासाठी कार्यवाही करावी – अहिर यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

0
517
Advertisements

यवतमाळ जिल्हयात मागच्या वर्षी पेक्षा खताचा पुरवठा कमी झालेला आहे. जुन महिण्यात मागच्यावर्षी 35 हजार टन युरीयाचा पुरवठा होता त्यात यावर्षी घट होवून तो 15 हजार टनावर आला आहे हि स्थिीती डिएपी, एमओपी, काॅम्प्लेक्स खत याबाबतही आहे. रेकाॅर्डवर खतांचा कमी झालेला पुरवठा निदर्शनास येत असल्याने कृषी विक्री केंद्र आणि शेतकरी त्रास्त आहे. विशेष करून ईफ्को, आरसीएफ, कृभको, कोरोमंडल या कंपन्यांनी अधिकाÚयांसोबत खताचे वितरण सुयोग्यपणे करण्याचा प्रयत्न केला नसल्यामुळे जिल्हयात खताची कमतरता भासत असल्याने याची दखल घेवून जिल्हाधिकाÚयांनी खतांचा मुबलक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधितांच्या बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी यवतमाळ जिल्हाधिकाÚयांना पत्राद्वारे केली आहे.
याबाबत अधिक सांगतांना यवतमाळ जिल्हयात खताचा प्रचंड तुटवडा असून वितरक आणि ट्रान्सपोर्टर आपल्या मर्जीने असमानतेने खताचा पुरवठा करित आहे. मागील 5 वर्षांपासून मोदी सरकार च्या कार्यकाळात खतांच्या पुरवठयाबाबतीत योग्य नियोजन व केेंद्राकडून वेळेवर पुरवठा होत असतांना महाराष्ट्रात तसेच यवतमाळ जिल्हयात युरीयासह अन्य खतंाचा पुरवठा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आणून देत हंसराज अहीर यांनी जिल्हाधिका-यांनी पुढाकार घेवून कृषी अधिकारी, ट्रान्सपोर्टर्स व कृषी केंद्र संचालकांची संयुक्त बैठक घेवून खत पुरवठा मुबलक करण्यासाठी योग्य दिशा ठरवावी असे सांगीतले. यवतमाळ जिल्हयात पिंपळखुटी हे नविन व जिल्हयातील एकमेव रॅक पाॅईंट आहे. जिल्हयातील सुमारे 9 लाख हेक्टर शेतजमीन पिकाखाली असतांना याचा वापर खत उत्पादक कंपन्या करित नसल्याने जिल्हयात धामणगांव व वर्धा येथून होणा-या खत पुरवठयात मोठया प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा आरोप करित यावर अंकुश लावण्याकरिता व शेतक-यांना युरियासह अन्य खते मुबलक उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी अहीर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here