युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान महत्वाचे

0
37
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना”च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजूरा विधानसभा शिवसेना,युवासेना,महिला आघाडी,भारतीय विद्यार्थी सेना,नुरानी बहुउद्देशीय युवा मित्र मंच व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ता.कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने 13 जून रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचांदूर येथील न्यु नरेश सिनेमा(नरेश टॉकीज)येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असून शिबिरात सोशल डिस्टंसिंग,मास्क अशाप्रकारे शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत रक्तदान कार्यक्रम पार पडणार असून रक्तदात्यांनी स्वत:चे मास्क स्वत: आणावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here