चंद्रपूर : येथील वेकोली मधील काम करणाऱ्या कंत्राटदारांनी खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेऊन विविध समस्यांच्या पाठ वाचला आहे. अनेक प्रश्न येथील कंत्राटदारांसमोर असून ते लवकर मार्गी लावण्याची विनंती कंत्राटदारांनी केली आहे.या सर्व समस्या मार्गी काढण्याकरिता वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक लावून या समस्या त्वरित सोडविण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
यावेळी प्रशांत भारती, सोहेल शेख, जे. के. गुप्ता, शम्मी अहमद, प्रसंग मेडपल्लीवार, समीर शेख, विजय येनपल्लीवार, जाकीर अली, अमीर शेख, आर. पी. सिंग यांची उपस्थिती होती.
वेकोली येथील छोट्या कंत्राटदारांना मोठ्या कंत्राटदारा प्रमाणे नियम आकारण्यात येत आहे. त्या सोबतच विविध अटी लादण्यात आल्या असल्याचे या कंत्राटदारांनी खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले. यावेळी सर्व कंत्राटदारांनी एक होऊन या समस्या सोडविण्यासाठी लढा देऊ असे आवाहन त्यांनी केले.
वेकोलीच्या कंत्राटदारांनी घेतली खासदारांची भेट
Advertisements