Advertisements
चंद्रपूर- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत युवक युवतींना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून दहा दिवसाचे शेळीपालन दुग्धव्यवसायव कुकुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी 14 जुन प्रयत्न अर्ज करण्याचे आव्हाहन प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड यांनी केले आहे.
सदर प्रशिक्षण 15 जुन ते 25 जुन दरम्यान दहा दिवसाचे असून यामध्ये शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन याविषयी सविस्तर माहिती मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उदयोग भवन चंद्रपूर येथे स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड, दोन फोटो घेऊन हजर राहायचे आहे.
*संपर्क करा*
प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड सर 94030787773
कार्यक्रम आयोजक एल. खोब्रागडे मॅडम 9309574045