माणिकगड सिमेंट कंपनीने रस्ता बांधकाम अडविले, खासदारांची दखल, जिल्हाधिकाऱ्याकडून चौकशीचे निर्देश

0
109
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:

अतिदुर्गम व आदिवासी क्षेत्रातील 8 ते 10 गावांना जोडणारा नौकारी,कुसुंबी,आसापूर रस्ता भुमापन नकाशा मध्ये स्वातंत्र्य पूर्व काळापासून रस्ते सिमांकन व वहिवाट असलेला व 1987,88 मध्ये नाल्यावर बांधलेल्या पुलावर अनाधिकृत ताबा कंपनीने करून ठिकठिकाणी तपासणी नाके बसवून बेकायदेशीर कब्जा केल्याने नागरिकांना वाहन व बैलबंडी ये-जा करण्यास अत्यंत गैरसोय व त्रास झाल्याने यापूर्वी अनेकवेळा आंदोलन व अनाधिकृत गेट तोडण्याची पाळी नागरिकांवर आली. आदिवासी बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून भितीयुक्त दहशत निर्माण करून वेठीस धरले.मात्र अनाधिकृत कब्जा हटविण्यास तहसीलदार राजूरा यांनी अनेक वेळा शब्द देऊन ही पोलिसांसमक्ष मात्र कारवाई करण्यास डोळेझाक केल्याचा आरोप जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी केला आहे.सार्वजनीक रस्ता भुपुष्ठ अधिकार कंपनीला बहाल केले नसताना रस्त्यावर चुनखडी उत्खनन करून मार्ग बदलविला.रस्त्यावर कर्मचारी गाळे व गेट बसवून रस्ता अडविला,मोक्का चौकशीत तहसीलदार उपविभागीय पोलिस अधिकारी,निरीक्षक भुमी अभिलेख यांनी स्वतः कंपनीच्या मजोरीचा अनुभव घेतला.त्याठिकाणी फलक लावून हा रस्ता सार्वजनिक नाही,प्रतिबंधित क्षेत्र असे लिहिले.या रस्त्यावर गेट बसविणे,मार्ग बदलण्याची परवानगी नसताना आदीवासींची अडवणूक केल्याबद्दल कंपनीवर तक्रारी असताना गुन्हा दाखल का होत नाही,नेमक पाणी कुठ मुरतोय याविषयी गावकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.परिसरात सुरू असलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेचे कुसुंबी,लिंगनडोह येथे कंपनीची मालकी नसताना रोड बांधकाम अडवल्याने गावात असंतोष वाढला व रसत्या अभावी नागरिकांना गैरसोय होत असल्याने खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना रस्ता नियमाप्रमाणे खुला करा,बंद पाडलेले काम सुरू करण्यासाठी जातीने लक्ष घाला असे पत्र दिल्यामुळे तससीलदार जिवती यांनी चौकशी सुरू केल्याने गावकरी स्वताः कामावर जावुन रस्त्याचे काम करू,अनाधिकृत गेट व रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी अतिक्रमण काढून फेकू असा इशारा दिला.सध्या लॉकडाऊन मध्ये शमलेले आंदोलन भडकण्याची चिन्हे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here