राजुरा – तालुक्यातील माथरा गावी जमिनीच्या वादातून चक्क तलवारी काढून जीवे मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे इतकेच नव्हे तर याची पोलीस तक्रार होऊन सुद्धा आरोपीना अटक झाली नाही.
5 ते 6 दिवसांपूर्वीचा हा वाद आहे, शेतकरी हरि झाडे हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या जागेवर शेती करतात, काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतात अशोक राव, बंडू घुगुल, विलास गाळवे यांनी 20 ते 25 लोकांचा समूह गोळा करून झाडे यांच्या शेतातील पराटी नष्ट केल्या, ही बाब हरी झाडे यांना कळली त्याच क्षणी ते शेतात गेले, परंतु 25 लोकांचा जमाव व त्यांच्या हातात तलवारी बघता झाडे यांनी संयमाने विनंती करीत का बरं माझ्या शेताचे नुकसान करता असे विचारले असता त्यांनी झाडे यांना तलवारीने कापून टाकतो अशी धमकी दिली.
सर्वांचा जमाव निघून गेल्यावर शेतकरी झाडे यांनी राजुरा पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली असता पोलिसांनी शस्त्र अधिनियम अंतर्गत सर्वांवर गुन्हा दाखल केला परंतु अटक कुणालाच केली नाही, लॉकडाउन असताना 20 ते 25 लोकांचा जमाव व हातात तलवारी हा गंभीर गुन्हा घडल्यावरही पोलिसांना त्यांना अटक का केली आहे हा न समजण्याचा प्रकार आहे.