चंद्रपूर : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात, राज्यात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. मोठं संकट सर्व नागरिकांवर कोसळल आहे. प्रत्येक माणसापर्यंत मदत पोहचविण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून समाजातील प्रत्येक माणसांनी समोर येऊन मदत करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले होते. त्या मदतीला साथ देत औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्थांनी एक लाख एक्यांशी हजार पाचशे रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली आहे. त्याबाबतचा धनादेश खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना सुपूर्त केला आहे.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, उपमुख्य अभियंता ओस्वाल, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, रामू तिवारी, शत्रूग्न येरगुडे, संजय ठाकरे, राहुल रायपुरे, महादेव डुडुरे, चेतन देरकर, राकेश वाटेकर, संदीप कल्हारे, आशा गोहणे, भारत आसूटकर, प्रवीण सुकदेवे यांची उपस्थिती होती.
पुढे देखील कोरोनाच्या लढ्यात आपण सर्व एक होऊन लढू असा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
खासदारांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्थांची साथ
Advertisements