आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर सुरू होणार रामाळा तलावातील मासेमारी

0
190
Advertisements

चंद्रपूर – रामाळा तलावातील मासेमारी बंद होती. त्यामूळे यावर निर्भर असणा-या मासेमारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हि बाब लक्षात घेता या तलावातील मासेमारी पून्हा सूरु करा अशा सूचना आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्यात. त्यानुसार आता येथील मासेमारी पुन्हा सुरु होणार आहे. या बैठकीत मासेमारी संघटनीचेही उपस्थिती होती.

चंद्रपूरातील रामाळा तलाव येथे मागील अनेक वर्षापासून मासेमारांकडून मासेमारी केल्या जात आहे. या मासेमारीवर जवळपास ३०० कुटुंब अवलंबून आहेत. मात्र सध्या खलीकरण करण्यासाठी हा तलाव पाणी विरहीत करण्यात आला आहे. त्यामूळे येथील मासेमारी बंद होती. परिणामी या ३०० कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. हा तलाव मासेमारीसाठी आरक्षीत आहे. जवळपास येथे ३०० सभासद आहेत. त्यांच्याकडून येथे मत्ससंवर्धन केल्या जाते. त्यानंतर हे मासे शहरातील बाजारपेठात विक्रीसाठी आणल्या जातात. याच व्यवसायावर हे सर्व कुटुंब अवलंबून आहेत. मात्र पावसाळयापूर्वी हे तलाव खोलीकरण करण्याच्या हेतूने तलावातील पाणी बाहेर सोडण्यात आले आहे. त्यामूळे येथील मासे ही नष्ट झाले. आता पावसाळा लागत असल्याने काही दिवसांमध्ये या तलावातील पाणीसाठयात वाढ होणार आहे. त्यामूळे येथील सभासदांना पुन्हा मत्स संवर्धन करुन मासेमारी करण्याची परवाणगी देण्यात यावी अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी आज बैठकीत जिल्हाधिकारीर्यांना केल्यात. जिल्हाधीकार्यांनीही या विषयावर सविस्तर चर्चा करत हा तलाव पुन्हा मासेमारीसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येथे बंद पडलेली मासेमारी पुन्हा सुरु होणार आहे. आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सह मासेमारांपैकी पांडूरंग गावतूरे, जगन पचारे, आंनदराव कचतूरे, लक्ष्मण तोकला, देवराव मंचलवार संतोष झाँ, आदिंची उपस्थिती होती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here