आदर्श शिक्षकाचा असा ही एक आदर्श, नवीन कार पार्किंगसाठी चक्क झाडाची कत्तल, नगरसेवक डोहे यांची संबंधीतांकडे तक्रार, झाडाच्या खर्चासह शिक्षकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी

0
230
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“झाडे लावा,झाडे जगवा” या ब्रीद वाक्यानुसार शासन दरवर्षी वृक्षलागवडी तसेच संगोपनावर करोडोंचा निधी खर्च करते. दिवसंदिवस वाढत्या प्रदूषणावर आळा बसावा,जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टीने अख्ख्या महाराष्ट्रात वृक्षारोपण कार्यक्रम राबवले जातात. याच श्रेणीत गेल्या 3,4 वर्षांपूर्वी गडचांदूर शहरात नगरपरिषद मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील इतर ठिकाणांसह प्रभाग क्रं.2 टीचर कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले होते.त्या लहान-लहान रोपट्यांचे आता मोठ्या वृक्षात रूपांतर होत असताना साई शांतीनगर टीचर कॉलनीतील “आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित एका शिक्षकाने नवीन कार ठेवण्यासाठी 3 वर्ष जूने झाड तोडून, लावलेला ट्री-गार्ड गल्लीत फेकल्याने “एका आदर्श शिक्षकाचा असाही आदर्श” समोर आला आहे.सदर झाडाच्या संगोपनासाठी आजपर्यंत आलेला संपूर्ण खर्च नुकसान भरपाई म्हणून वसूल करून या शिक्षकावर पोलिस कारवाई करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी गडचांदूर न.प.मुख्याध्याऱ्यासह जिल्हाधिकारी,मुख्यकार्यपालन अधिकारी, जि.प.अध्यक्ष व इतर संबंधित विभागाकडे लेखी तक्रार मार्फत केली आहे.सध्या मानवाच्या विकासामुळे वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून शहरात जागा अपुरी पडत आहे.वनसंपत्ती नष्ट करून त्याठिकाणी लोक वस्त्या तयार होत आहे. मोठ्याप्रमाणात याचा दुष्परिणाम दिसत असून दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत पर्जन्यमान कमी होत आहे.वन संपत्ती नष्ट होत असल्याने पशु पक्ष्यांचा आसरा ही नाहीसा झाला आहे.निसर्गाचे संतुलन राहिले नसून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध हवा,पाणी मिळण्यासाठी झाडांची गरज निर्माण झाली आहे.लोकांना वृक्षसंवर्धनाचे महत्व समजण्यासाठी शहरात वृक्षदिंडी काढून वृक्ष संवर्धन,झाडे लावा,झाडे जगवा,प्रदुषण टाळा अशा घोषणांचे फलक न.प.ने शहरात लावले होते.विशेष म्हणजे सदर शिक्षकांनी शाळेत,गावात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला होता मात्र स्वतःच्या हितासाठी अशाप्रकारे झाड तोडणे कितपत योग्य. कॉलनीत लावलेल्या सदर झाडांची ठेकेदारांनी व्यवस्थीतपणे जोपासना केली. याची बिले सुद्धा उचलली.तोडलेल्या वृक्षाची उंची अंदाजे 10 ते 12 फूट इतकी होती.यासंदर्भात न.प.कडुन कुठलीही रितसर परवानगी न घेता झाड तोडून ट्री-गार्ड स्वतःच्या गल्लीत डांबून ठेवले आणि त्या ठिकाणी मुरूम टाकून रोड पेक्षा उंच जागा कार पार्किंगसाठी तयार केली.आता सदर शिक्षक टीनाचे शेड उभारण्याच्या बेतात दिसत असून घर अगदी रस्त्याच्या मोडीवर असल्याने भविष्यात रेती,गिट्टी,विटा इतर वस्तुंच्या जड वाहनांना नाहक त्रास होऊन मोठा धोका पत्करावाकरावां लागेल तसेच रस्त्यापेक्षा जागा उंच केल्याने त्याठिकाणी पाणी साचणार परिणामी याचा त्रास संपूर्ण वार्ड वासीयांना सहन लागेल अशी शंका डोहे यांनी व्यक्त केली आहे.आज तारखेला शहराचा विचार केल्यास सर्वात जास्त झाडे याच कॉलनीत पहायला मिळते.मात्र विना परवानगी अशाप्रकारे झाडाची कत्तल होऊनही जर कुठलीच कारवाई झाली नाही तर इतरही रहिवासी एक-एक झाड तोडून संपूर्ण हिरवळ नष्ट करतील यात दुमत नसून मोक्का चौकशी करून सदर शिक्षकावर पोलिस कारवाई करावी,या झाडांच्या संगोपनासाठी लागलेला खर्च नुकसान भरपाई म्हणून वसूल करावा अशी विनंती वजा मागणी नगरसेवक डोहे यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.मात्र सदर प्रकरण मुख्याधिकारी किती गांभीर्याने घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here