इंदिरानगर येथील युवतीला अमानुषपणे मारहाण, 2 भावंडांनी जळत्या काडीने केली मारहाण

0
118
Advertisements

चंद्रपूर – इंदिरा नगर येथील 23 वर्षीय युवतीला त्याच भागातील गणेश व सूरज कुंकवास यांनी अमानुषपणे मारहाण करीत विनयभंग केला.
लहानश्या कारणावरून त्या युवतीला जळत्या काडीने मारहाण करीत त्या युवतीच्या आंधळ्या वडील व आईला जबर मारहाण केली.
युवतीने या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला द्यायला पोहचली असता पोलिसांनी त्यांना मेडिकल न घेऊन न जाता तुम्हीच हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला.
असा आरोपी पीडित युवतीने केला आहे.
समाजात आज महिला मुलीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे यावर नियंत्रण व आरोपींवर कडक कारवाई अशी मागणी आज सामान्य नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here