ती आईची भेट शेवटची ठरली, वेकोली कर्मचाऱ्यांचा वाहन अपघातात मृत्यू

0
120
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस – बुधवारी 11 जूनला नितीन पोगुला नामक युवक आपल्या आईला भेटण्यासाठी घुग्गुसला आला होता, आईची भेट घेतल्यानंतर चंद्रपुरातील दुर्गापूर येथील आपल्या घरी जाण्यास निघाला असता वाटेतच घुग्गुस चंद्रपूर मार्गावरील वांढरी फाट्याजवळ चारचाकी वाहन क्रमांक mh34 ab 7574 ने नीतीनच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत नितीन चा जागीच मृत्यू झाला, नितीन हा दुर्गापुर येथे वेकोली मध्ये कार्यरत होता, 2 वर्षाआधी त्याला वेकोली मध्ये नोकरी मिळाली होती, नितीन च्या जाण्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

नितीन पश्चात त्याची आई, पत्नी व 5 महिन्याच बाळ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here